मुंबई

‘अवतरण’ला ‘अक्षरआनंद’ सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार जाहीर

CD

‘अवतरण’ला ‘अक्षरआनंद’चा
सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार
मुंबई, ता. ३ ः डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित दिवाळी अंक स्पर्धेत ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ला ‘अक्षरआनंद सर्वोत्तम दिवाळी’ अंक पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्याणमध्ये शनिवारी, ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.
दरवर्षी समाजजीवनाला प्रभावित करणाऱ्या विषयांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या आणि विविध पुरस्कार मिळवणाऱ्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाने आतापर्यंत पर्यावरण, हिंदुत्व, विचारधारा आणि कोलाहल यांसारख्या विषयांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे. युद्धावर आधारित असलेल्या यंदाच्या दिवाळी अंकाची विशेष दखल ‘अक्षरआनंद’ पुरस्कारासाठी घेण्यात आली.
‘अवतरण’सोबतच ‘चांगुलपणाची चळवळ’, ‘हॅशटॅग’, ‘वाघूर’, ‘सृजन संवाद’ आणि ‘नितांत’ दिवाळी अंकांचाही सन्मान करण्यात येणार आहे. विशेष लक्षवेधी दिवाळी अंकाचे पुरस्कार ‘नृत्यवकाश’, ‘पत्रकार दर्पण’, ‘पसायदान’, ‘जॉय’ आणि ‘युवासूत्र’ यांना जाहीर झाले आहेत. आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेतर्फे ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान कल्याण पश्चिमेतील बालक मंदिर संस्था सभागृहात होणाऱ्या अखंड वाचनयज्ञ समारोप सत्रादरम्यान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
‘अवतरण’चा यंदाचा दिवाळी अंक ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ अशा संकल्पनेवर आधारित आहे. युद्धाच्या कथा, व्यथा आणि वास्तवाचे भान प्रगल्भतेने मांडण्याचा प्रयत्न ज्येष्ठ विचारवंत अन् राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासकांनी अंकात केला आहे.

अखंड वाचनयज्ञ
अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ५ आणि ६ डिसेंबर रोजी कल्याणमध्ये अखंड वाचनयज्ञ सादर करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध वाचनसत्रे होणार आहेत. कल्याण, मुंब्रा, अंबरनाथ, डहाणू इत्यादी परिसरातील अनेक शाळांमध्ये एकाच वेळी वाचनसत्र सुरू राहणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या वाचनसत्रात ज्येष्ठ साहित्यिक, कवी-कवयित्री, प्राचार्य, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

३० नंतर टीम इंडियात एंट्री; ३५ व्या वर्षी विश्वचषक जिंकणारा कर्णधार... सूर्यकुमार यादवचा संघर्ष ते विश्वविजय प्रवासाची प्रेरणादायी यशोगाथा

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतत होते; मात्र वाटेतच काळानं गाठलं, लग्नाआधीच लेकीचं पितृछत्र हरपलं

Akola News : ‘चिटफंड’चा वाद पेटला, प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत; ‘बीसी’चे पैसे न मिळाल्याने ग्राहक हैराण

SCROLL FOR NEXT