अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ‘काव्यानंद :
आविष्कार शब्दसुरांचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
विरार, ता.३ (बातमीदार) : विविध भावच्छटा, लयबद्ध सूर आणि काव्यसृष्टीचा सुरेल अनुभव देणारा ‘काव्यानंद : आविष्कार शब्दसुरांचा’ हा वार्षिक कार्यक्रम अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे यंदाचे १५वे पुष्प सुप्रसिद्ध समीक्षक आणि व्याख्याते प्रा. उत्तम भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुंफण्यात आले.
जान्हवी मांजरेकर (वाणिज्य), काजल गायकवाड (कला) आणि लक्ष्मी यादव (कला) या विद्यार्थिनींनी स्वरचित कविता सादर केल्या. तसेच, योगेश नरवडे या विद्यार्थ्याने ''आई'' या गीताचे भावपूर्ण सादरीकरण केले. कार्यक्रमात विविध विभागातील प्राध्यापकांनीही स्वरचित आणि मान्यवर कवींच्या कविता सादर करून काव्यमंच उजळून टाकला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतीक्षा मोरे, प्राची कदम व वैभवी मोरे या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. तसेच, सूरज निकम व प्रणाली हुले यांनी लेखन केलेल्या ''प्रेरणा'' या भित्तीपत्रकाचे आणि वैभवी मोरे हिने काढलेल्या वारली चित्रकलेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
हा कार्यक्रम साहित्यप्रेमी विद्यार्थी व प्राध्यापकांच्या मनावर ठसा उमटवून गेला. मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष महेश जायसवाल, उपाध्यक्ष नेहा साबळे, सचिव प्रतीक्षा मोरे, सहसचिव सुरज निकमआणि सर्व प्रतिनिधींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
पाहुण्यांची काव्यमैफल
प्रा. उत्तम भगत यांनी ''कविता ही हृदयाशी संवाद साधत असते,'' असे सांगत कवितेचे महत्त्व व्यक्त केले. त्यांनी बालकवितांपासून गझलपर्यंत विविध काव्यप्रकारांमधील स्वरचित तसेच अन्य कवींच्या रचना सादर करून रसिकांना काव्यास्वाद दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक आशय असलेली कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.