मुंबई

डॉ. महादेव इरकर यांची ''आयडॉल'' शिक्षक म्हणून निवड

CD

डॉ. महादेव इरकर यांची ‘आयडॉल’ शिक्षक म्हणून निवड
विरार, ता. ४ (बातमीदार) : विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, वसईतून डॉ. महादेव इरकर यांची ‘आयडॉल’ शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
डॉ. इरकर हे विरार येथील कैं. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षणाचे ध्येय साधणाऱ्या राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांची निवड केली आहे. पालघर जिल्ह्यातून निवड झालेल्या १५ शिक्षकांमध्ये डॉ. इरकर यांचा समावेश आहे.
डॉ. इरकर यांचा सन्मान शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील तपाडिया नाट्यगृहात केला जाणार आहे. या निवडीबद्दल मुख्याध्यापिका, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह वसई तालुक्यातील सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT