मुंबई

मिरा-भाईंदरचा पाणीपुरवठा आज १२ तास खंडित

CD

भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेली कामे व जलवाहिनी दुरुस्ती या कामांसाठी स्टेमचा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. ५) १२ तासांसाठी बंद रहाणार आहे.

ठाण्यातील ओवळा, कासारवाडवली येथे एमएमआरडीएअंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्या ठिकाणी स्टेम प्राधिकरणामार्फत तीन एअर व्हाॅल्व स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मिरा-भाईंदर शहरातील भाईंदर पूर्व भागातील आझादनगर, अश्विनी बँक्वेट हॉलसमोरील महापालिकेच्या १,००० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर अचानक गळती सुरू झाली आहे. गळती बंद करण्याचे काम करण्याकरिता १२ तासांचा शटडाऊन घेणे अत्यावश्यक झाले आहे.

ही दोन्ही कामे करण्याकरिता शुक्रवारी (ता. ५) सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत (१२ तासाकरिता) मिरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यत मिरा-भाईंदर शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT