मुंबई

माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

CD

माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात
लोणेरे येथे दोन दिवस विविध नवकल्पनांची जल्लोषात मांडणी
माणगाव, ता. ४ (वार्ताहर) ः शिक्षण विभाग, पंचायत समिती माणगाव, पन्हळघर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ लोणेरे आणि माणगाव तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणेरे येथील जे. बी. सावंत हायस्कूलमध्ये १ व २ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. विकसित आणि आत्मनिर्भर भारत या थीमवर आधारित या प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि सर्जनशील प्रतिकृतींमधून विज्ञानाचा प्रभावी संगम सादर केला.
प्रास्ताविकात सुरेखा तांबट यांनी विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्ती, कलात्मकता, वैज्ञानिक दृष्टी, सादरीकरण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविणारे सक्षम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन केले, तर गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीसोबत संवेदनशीलता टिकून राहणेही अत्यंत महत्त्वाचे, असे सांगत विद्यार्थ्यांना चौकस राहण्याचा सल्ला दिला. नानासाहेब सावंत यांनी तंत्रज्ञानाचा अतिरेक टाळण्याचे आणि त्याचा सकारात्मक वापर करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. दुसऱ्या दिवशी अध्यक्ष भाऊसाहेब सावंत यांनी भाभा बालवैज्ञानिकांसोबत संवाद साधत त्यांच्या प्रतिकृतींची माहिती जाणून घेतली. शिक्षक व पालक विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला कसे प्रोत्साहन देऊ शकतात याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. उद्‌घाटन सोहळ्यास माणगाव तालुका गटविकास अधिकारी शुभदा पाटील, कार्याध्यक्ष नानासाहेब सावंत, जे. बी. सावंत विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब सावंत, गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, तसेच लोणेरे ग्रामपंचायत सरपंच प्रकाश टेंबे, विस्ताराधिकारी कुमार खामकर, प्राचार्य बी. आर. कांबळे, गणित-विज्ञान मंडळाचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................
विद्यार्थ्यांकडून प्रतिकृती सादर
प्रदर्शनात इयत्ता ६ वी ते ८ वी गटात ३६ प्रतिकृती, तर ९ वी ते १२ वी गटात २७ प्रतिकृती सादर झाल्या. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तीन, प्राथमिक शिक्षकांच्या तीन, आणि माध्यमिक शिक्षकांच्या चार प्रतिकृतींचाही समावेश होता. प्रतिकृतींचे विषय शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन व प्लॅस्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य व स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर आधारित होते.

बालवैज्ञानिकांनी सादर केलेल्या या सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांनी प्रदर्शनाला रंगतदार रूप दिले. दोन दिवस चाललेल्या या विज्ञान सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची ओढ आणखी वृद्धिंगत झाल्याचे शिक्षकांनी नमूद केले.

फोटो ओळ : माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, लोणेरे येथे उत्साहात संपन्न झाले. त्या वेळी उपस्थित शिक्षकांचा समूह.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : हिवरखेड प्रा.आ.केंद्रात अवैध गर्भपाताची शक्यता

SCROLL FOR NEXT