मुंबई

पोयनाड परिसरात श्री दत्तजयंती उत्साहात साजरी

CD

पोयनाड परिसरात श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी
पोयनाड, ता. ४ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मदिन, दत्त जयंतीचा उत्सव शनिवारी अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या गजरात मंदिरांत भक्तांची मोठी गर्दी दिसून आली.
परिसरातील अनेक गावांमधील दत्त मंदिरात पहाटेपासूनच पूजा, अभिषेक, आरत्या, भजन आणि कीर्तन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहाबाज (रतनगड) येथील यात्रेला पहाटे अभिषेक आणि आरतीने प्रारंभ झाला. या एकदिवसीय यात्रेसाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. पेझारी येथे श्रीपंत भक्त मंडळ यांच्या वतीने ६० वा श्रीदत्त जयंती उत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यात आला. श्री दत्तात्रेय सहस्त्रनामावली, पारंपरिक पालखी सोहळा, महाप्रसाद आणि सायंकाळी मोठ्या भक्तिभावात साजरा झालेला दत्त जन्मोत्सव या कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण ठरले. बांधण येथील श्री स्वामी समर्थ मठातही मोठ्या उत्साहात आणि भक्तांच्या अलोट गर्दीत उत्सव पार पडला.
................
पोयनाड, पेझारी, कुसुंबळे, तीनवीरा, शहापूर, वाघोडे, नारंगी, वाघोली, हाशिवरे, शहाबाज, कुर्डुस, सांबरी या गावांमध्ये भक्तिमय कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते. भजन, कीर्तन, काकड आरती, सहस्त्रनामावली पठण हे कार्यक्रम दिवसभर सुरू राहिले. काही गावांमध्ये सायंकाळी पारंपरिक चमूंसह पालखी सोहळा काढण्यात आला आणि त्यानंतर दत्त जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. परिसरातील सर्व गावांमध्ये झालेल्या या उत्सवामुळे पोयनाड परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भाविकांच्या उपस्थितीमुळे गावागावात सणासुदीचे, धार्मिक आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT