मुंबई

थंडीच्या धुक्यात हरवलेली अरू

CD

थंडीत मिळाली मायेची ऊब!
पाड्यावरील घर गाठत चिमुकलीला सुरक्षित सोडले

कासा, ता. ५ (बातमीदार) ः डहाणू-जव्हार राज्यमार्गावर शुक्रवारी (ता. ५) सकाळी कडाक्याच्या थंडीमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. तीन वर्षांची चिमुकली अंगावर कपडे नसलेली, थरथरत रडत रस्त्याच्या कडेला उभी होती. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. भिसे विद्यालयात अध्यापनासाठी जात असलेल्या योगिता वाघ यांच्या नजरेस हे दृश्य पडताच त्यांनी क्षणाचा विलंब न करता तिला मायेची ऊब दिली.
शाळेची वेळ असूनही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाघ यांनी लगेच कॉलेजमध्ये जाऊन सहकाऱ्यांना माहिती दिली. पुन्हा त्या ठिकाणी परतल्या. ती चिमुकली भीतीने गोंधळलेली आणि बोलण्याइतकीही सक्षम नव्हती. दोन महिलांची मदत घेऊन तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला; पण ती बोलू शकत नव्हती. त्याच वेळी पोलिस भरतीसाठी जात असलेल्या एका विद्यार्थिनीला वाघ यांनी थांबवले. तिने तिच्या बोलीभाषेत संवाद साधताच चिमुकलीने हातवाऱ्यांनी तिचे पाड्यावरील घर दाखवले. नंतर वाघ यांनी तिला स्कूटीवरून घरी नेले.

संवेदनशीलता
घरी पोहोचल्यावर घरात तिच्यापेक्षा थोडी मोठी मुलगी दिसली. तिची ती बहीण होती. तिच्या ताब्यात तिला दिल्यानंतर वाघ यांनी पालकांविषयी विचारणा केली. शेजाऱ्यांनी तिची आई कदाचित कामाला गेली असेल, अशी माहिती दिली. दरम्यान, वाघ यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. सूचना मिळताच पोलिसही घटनास्थळी आले. वाघ यांच्यासोबत त्या घरी जात शेजाऱ्यांना, या मुलीकडे लक्ष ठेवा, आम्हीही लक्ष ठेवत आहोत, असे सांगत परिसरावर देखरेख ठेवण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. कडाक्याच्या थंडीत रडत उभ्या असलेल्या तिला सुरक्षित घरी पोहोचविण्यात वाघ, विद्यार्थिनीचा प्रतिसाद आणि पोलिसांची तत्परता तिघांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Breaking News LIVE: मालवणी पोलिसांकडून नायजेरियन नागरिकाला ७२ लाखांच्या कोकेनसह अटक

Gold Price: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार, आश्चर्यकारक अहवाल समोर

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Pune News : कमला नेहरू रुग्णालयात २५ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती; पगारात केली दुप्पटीने वाढ

Snake Bite : संर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचे वाचणार प्राण; ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट कीट’ ठरणार जीवरक्षक

SCROLL FOR NEXT