मुंबई

समाजकंटकाकडून विटंबना; दोघांवर गुन्हा दाखल

CD

भिवंडीत अभिवादन बॅनरची विटंबना
कवाड गावातील घटना; दोघांवर गुन्हा दाखल
भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) ः तालुक्यातील कवाड गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लावण्यात आलेल्या अभिवादन बॅनरची समाजकंटकांनी विटंबना केली. ही घटना शुक्रवारी (ता. ५) घडली. याप्रकरणी संतप्त समाजबांधवांनी तालुका पोलिस ठाण्यात एकत्र येत दोन समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोहित दीपक दास ऊर्फ बर्फी व अनिल दिनेश खोपकर (रा. दुमाडापाडा कवाड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आरपीआय सेक्युलरचे तालुका कार्याध्यक्ष व कवाड येथील रहिवासी विजय किसन भोईर यांनी कवाड नाक्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनाचा बॅनर लावला होता. रोहित व अनिल यांनी संगनमताने या बॅनरची विटंबना करत बॅनर फाडून त्या बॅनरच्या जागी गावातील कार्यकर्त्यांनी स्वतःचे बॅनर लावल्याचा आरोप विजय भोईर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
त्यांना अटक केली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू, असा इशारा आरपीआय सेक्युलरचे ॲड. किरण चन्ने यांनी दिला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस योग्य तो तपास करून संबंधित आरोपींवर योग्य ती कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT