कल्याणमध्ये जनआक्रोश मोर्चा
युवक काँग्रेसची केडीएमसी मुख्यालयावर धडक
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : युवक काँग्रेसतर्फे शुक्रवारी (ता. ५) शहरात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या भोंगळ व निष्क्रिय कारभाराविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, घनकचरा व्यवस्थापनातील अकार्यक्षमता, दूषित पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, अपुरी आरोग्य सुविधा, सततचा वाहतूक कोंडीचा त्रास, तसेच शहर विकासातील उदासीनता याबाबत युवक काँग्रेसने प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
मोर्चाचे नेतृत्व कल्याण-डोंबिवली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग माटा यांनी केले, तर कल्याण पश्चिम युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष शादाब खान यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख, ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे, रीना खांडेकर, हरमीत सिंग, फैझ खान, विमलेश विश्वकर्मा, श्रेयस सिंग आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाच्या प्रशासनाचा निषेध नोंदवून तत्काळ सुधारणा करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.