मुंबई

मध्य रेल्वेच्या व्हीजीलन्स विभागाचा कल्याण पूर्वेतील पार्किंगवर छापा

CD

कल्याण पूर्वेतील रेल्वे पार्किंगवर छापा
मध्य रेल्वेच्या व्हिजिलन्स विभागाची कारवाई; चालकास अटक
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) ः मध्य रेल्वेच्या व्हिजिलन्स विभागाने कल्याण पूर्वेतील रेल्वेच्या पे ॲण्ड पार्कवर छापा टाकला. यात चालकाचे बनावटी पावतीपुस्तक मिळाले. प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून हे पार्किंग चालविले जात असल्याची बाब व्हिजिलन्स विभागाच्या निदर्शनास आली. पार्किंग चालविणारा हरिशंकर प्रजापती याला कारवाई पथकाने अटक केली आहे.
कारवाई पथकातील एकाने पार्किंगवर गाडी पार्क केली. त्या ठिकाणी पावती घेतली. त्या पावतीवर डीएस एंटरप्रायझेस साईट एम असे लिहिले होते. कारवाई पथकातील अधिकाऱ्यास संशय आला. त्याने त्याला दिलेली पावती तपासून पाहिली असता ती पावती बनावट असल्याचे आढळले. देण्यात आलेली पावती पार्किंग चालकाने स्वत: छापली होती. त्या ठिकाणीची कागदपत्रेही बनावट असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी कारवाई पथकाने हरिशंकर प्रजापती याला ताब्यात घेऊन आरपीएफच्या हवाली केले आहे.
तपास सुरू
आरपीएफकडून पुढील तपास सुरू आहे. हे पार्किंग प्रजापती कधीपासून चालवित होता, त्याने रेल्वे प्रशासनाची फसवणूक केली आहे. त्यातून त्याने किती माया गोळा केली, या कामात त्याला रेल्वे अधिकारी आणि अन्य कोणत्या अधिकारी वर्गाची साथ होती का, या विविध अंगाने तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT