मतदारांचे दुबार पीक
ठाणे पालिका क्षेत्रात ८३ हजार संभाव्य नावे!
ठाणे, ता. ६ : ठाणे महापालिका क्षेत्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल ८३ हजार ६४४ संभाव्य दुबार नावे असल्याची कबुली खुद्द पालिकेने दिली आहे. प्रत्येक प्रभागात सरासरी २०० ते ३०० नावे दुबार असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. या दुबार नावांवरून यापूर्वीच विरोधकांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. महापालिकेने आता आपल्या अधिकृत संकेतस्थळावर संभाव्य दुबार नावांची स्वतंत्र यादी जाहीर करून या त्रुटीला दुजोरा दिला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, या त्रुटींमध्ये समान नावामुळे झालेला गोंधळ, फोटो उपलब्ध नसणे तसेच एकाच नावाच्या दोन भिन्न व्यक्तींचा समावेश अशा विविध कारणांचा समावेश आहे.
अंतिम मतदार यादी १० डिसेंबरला प्रसिद्ध होणार असून, त्याआधी या त्रुटी कितपत दुरुस्त होतात याकडे ठाणेकरांचे लक्ष असेल. दरम्यान, महापालिकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर संभाव्य दुबार नावांची स्वतंत्र यादी जाहीर करून चुकीला दुजोरा दिला आहे. या नावांमध्ये समान नावांमुळे झालेला गोंधळ, फोटो उपलब्ध नसणे तसेच एकाच नावाच्या दोन भिन्न व्यक्तींचा समावेश अशा विविध कारणांमुळे झालेल्या त्रुटींचा समावेश असल्याचे महापालिकेच्या माहितीत म्हटले आहे.
यादीतील गोंधळावरून यापूर्वीच विरोधकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मतदार यादीत नवी मुंबईतील नावे समाविष्ट झाल्याचे उदाहरण देऊन पालिकेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर माजी खासदार राजन विचारे यांनी पुराव्यासह ही दुबार नावे उघड करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कठोर कारवाईचे इशारेही देण्यात आले होते.
आकडेवारी
दुबार नावे : ८३,६४४
प्रारूप यादीतील एकूण मतदारसंख्या: १६ लाख ४९ हजार ८६७
पुरुष मतदार : आठ लाख ६३ हजार ८७८
महिला मतदार : सात लाख ८५ हजार ८३०
निवडणूक मतदारसंख्या वाढ
२०१७ १२ लाख २८ हजार ६०६ ---
नवीन प्रारूप यादी १६ लाख ४९ हजार ८६७ चार लाख २१ हजार २६१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.