मुंबई

उरणकरांसाठी १० लोकल फेऱ्या

CD

उरणकरांसाठी १० लोकल फेऱ्या
तरघर, गव्हाण स्थानकांवर थांबा, प्रवाशांना दिलासा
उरण, ता.६ (वार्ताहर)ः नवी मुंबई विमानतळावरून २५ डिसेंबरला विमान सेवा सूरू होणार आहे. याच अनुषंगाने रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या पोर्टलाईन मार्गावरील उपनगरीय सेवा वाढवण्यात आली आहे. यामुळे नेरूळ-उरण आणि बेलापूर-उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आमदार महेश बादली यांनी रेल्वे फेऱ्या वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
नेरूळ-उरण आणि बेलापूर-उरण विभागातील पोर्ट लाईनवरील लोकल सेवांची गती वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार उरण पोर्ट लाईनवर नवीन १० लोकल सेवा सुरू होणार आहेत. नेरूळ-उरण, उरण-नेरूळ ४ फेऱ्या, बेलापूर-उरण-बेलापूर ६ फेऱ्या नियोजन करण्यात आले आहे. तसेच तरघर, गव्हाण येथील उपनगरीय रेल्वे स्टेशनांना लोकल थांब्याची सुविधा दिली जाणार आहे. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ आहेत. उलवे नोड बेलापूर आणि नेरूळच्या पुढे उरणकडे जाणाऱ्या पोर्ट लाईनवर आहे. तरघर आणि गव्हाण स्टेशनांना लोकल थांब्याची मंजुरी मिळणे, हा उलवे परिसरातील रहिवाशांसाठी सर्वात मोठा फायदा आहे.
---------------------------------
सुविधेचे फायदे
- उलवे हा सिडकोने विकसित केलेला सुनियोजित परिसर आहे. येथे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. या स्टेशनांवर लोकल थांबल्याने उलवे नोडमधील रहिवाशांना थेट सीबीडी-बेलापूर, नेरूळ, पुढे ट्रान्स-हार्बर मार्गे ठाणे/मुंबई कडे जाण्यासाठी जलद पर्याय उपलब्ध होईल.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर रहदारी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे लोकल थांब्यांमुळे विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी तसेच प्रवाशांसाठी वाहतुकीचा एक महत्त्वाचा दुवा तयार होईल.
- अनेक शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुले विकसित होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hapus Dispute: वलसाड हापूस नावाने जीआय टॅगसाठी अर्ज, मालकी हक्कही सांगितला अन्...; कोकणातील हापूस आंब्यावर गुजरातचा दावा

Bank Holiday : पुढील आठवड्यात कधी असणार बँकांना सुट्टी? ; जाणून घ्या, महत्त्वाची माहिती अन्यथा खोळंबतील कामे

चार हजार मीटर खोल समुद्रात १६० दिवस राहिले वैज्ञानिक; प्रशांत महासागरात जे दिसलं त्याने सगळेच हादरुन गेले

इंदू मिल स्मारकाबाबत मोठी अपडेट! डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कधी पूर्ण होईल? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

IND vs SA 3rd ODI: जैस्वालचं शतक अन् विराट-रोहितची फिफ्टी; भारताने दणदणीत विजयासह द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

SCROLL FOR NEXT