उंच इमारतींना सुरक्षाकवच
पनवेल पालिकेकडून अग्निशमन दलाचे सक्षमीकरण
पनवेल, ता. ६ (बातमीदार)ः आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी पनवेल पालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. याच अनुषंगाने उंच इमारतींच्या संरक्षणासाठी अग्निशमन दलात ५५ मीटर आणि २८ मीटर उंचीची अत्याधुनिक एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहन आणले जाणार आहे.
पनवेलमध्ये गृहनिर्माण प्रकल्प, व्यावसायिक संकुले, मॉल्स, रुग्णालये, हॉटेल्स तसेच औद्योगिक क्षेत्राची वेगाने वाढ झाली आहे. हाई-राईज इमारती आणि टॉवर्स उभे राहत असताना आगीच्या घटना किंवा अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आधुनिक साधनांची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत होती. सद्यःस्थितीत उपलब्ध साधनसामग्री उंच इमारतींच्या बचावकार्यासाठी पुरेशी नसल्याने एरियल लॅडर्सची गरज अधिक महत्वाची ठरत होती.
याच अनुषंगाने पनवेल पालिकेच्या अग्निशमन विभागात आग विझवण्यापासून ते अडकलेल्या नागरिकांचा सुरक्षित रेस्क्यू, औद्योगिक दुर्घटना आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये जलद प्रतिसाद देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-------------------------------------------
५५ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म
- १५ ते २० मजली आणि त्याहून उंच इमारतींसाठी उपयुक्त
२८ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म
- मध्यम उंचीच्या इमारती, निवासी संकुले, रुग्णालये, शाळा, हॉटेल्ससाठी अत्यंत प्रभावी
----------------------
अपेक्षित खर्च -२२ कोटी
-------------------------
यंत्रणेचे फायदे
- उंच इमारतींमधील आगीवर तातडीने नियंत्रण
- अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षितपणे सुटका.
- औद्योगिक व रहिवासी क्षेत्रातील दुर्घटनांमध्ये प्रतिसाद.
- नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत, बचावकार्याला वेग.
------------------------
नागरिकांचे प्राण, मालमत्तेचे संरक्षण महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी आहे. अत्याधुनिक सुविधा उभारण्याचा प्रयत्न असून, ५५ मीटर व २८ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्मची खरेदी त्यादृष्टीने उचलेले पाऊल आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.