मुंबई

बदलापुरात उसळला भीमसागर

CD

बदलापुरात उसळला भीमसागर
मध्यरात्री हजारो अनुयायांची गर्दी
बदलापूर, ता. ६ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बदलापूर पश्चिम परिसरातील रमेशवाडी येथे अभूतपूर्व ‘भीमसागर’ उसळला. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो भीम अनुयायी शांतता आणि शिस्तीत एकत्र जमले. शहरातील विविध प्रभागांमधून महिला, पुरुष तसेच लहान मुले पांढऱ्या वस्त्रांमध्ये, हातात मेणबत्त्या प्रज्वलित करत शांतता रॅलीच्या माध्यमातून पुतळ्यासमोर एकवटले.

कोणताही गोंधळ किंवा अराजकता न होता, या वेळी सर्वत्र शांतता आणि शिस्तीचे वातावरण राखण्यात आले. रॅलीत सहभागी नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करत समानता, बंधुभाव आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना मनोमन सलाम केला. या वेळी सामुदायिक बुद्ध वंदना व पंचशील पठण करण्यात आले.

महापरिनिर्वाण दिनाची सकाळही ऊर्जा देणारी ठरली. सकाळी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय बौद्ध महासभा बदलापूर शाखा आणि बौद्धजन पंचायत समितीच्या सगळ्याच शाखांमधील हजारो अनुयायांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमातून श्रद्धा, अनुशासन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे ‘भीमसागर’ नावाचा हा अनोखा समूह यंदाही ऐतिहासिक ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT