मुंबई

मॉडेल शाळा व महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम

CD

मॉडेल महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम
कल्याण, ता. ६ (बातमीदार) : ‘द इस्ट कल्याण वेलफेअर सोसायटी’ संचलित मॉडेल शाळा आणि महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने झाली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकरांच्या विचारांचे आणि शिकवणीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणांतून बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
मॉडेल कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सतर्फेही भारतरत्न डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणांतून सामाजिक न्याय, समानता आणि राष्ट्रनिर्मितीतील बाबासाहेबांच्या योगदानाचा गौरव केला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गोंसाल्वेज शिरीन थॉमस यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, स्वाभिमान आणि घटनात्मक जबाबदारी या बाबासाहेबांच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य राजाराम कदम आणि कार्यालयीन अधीक्षक कल्याणी आधारी यांनीही आपल्या विचारांतून डॉ.आंबेडकरांच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप लोकशाही, सलोखा आणि मानवाधिकारांच्या तत्त्वांचे पालन करण्याची शपथ घेऊन झाला. दरम्यान, शाळेचे आधारस्तंभ भगवान भोईर, सचिव आनंद नायर, सहसचिव निलेश शिंदे, खजिनदार नरेंद्र सूर्यवंशी आणि सदस्य महेश गायकवाड व दत्ता गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT