मुंबई

‘सागरा प्राण तळमळला...’ काव्याला ११६ वर्षे

CD

‘सागरा प्राण तळमळला...’ काव्याला ११६ वर्षे

पोर्ट ब्लेअरमध्ये सावरकर पुतळ्याचे होणार अनावरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सागराच्या लाटांना साक्षी ठेवून रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला...’ या काव्याला ११६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून पाेर्ट ब्लेअरमधील विजयापूरम येथे ‘सागरा प्राण तळमळला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते बियोदनाबाद येथे सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हाेणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

‘व्हॅल्युएबल ग्रुप’च्या वतीने १२ डिसेंबरला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार, पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अभिनेता रणदीप हुड्डा, लेखक डॉ. विक्रम संपत आणि अभिनेते शरद पोंक्षे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सावरकर यांच्या पुतळ्याची रचना प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे. ‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे संचालक अमेय हेटे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारण्यात आला आहे.

संगीतमय आदरांजली
पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांच्या सुरेल सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा येणार आहे. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला...’ हे काव्य आकर्षण ठरणार आहे. याशिवाय ‘जयोस्तुते...’, ‘जय जय शिवराया...’, ‘हे हिंदू नृसिंहा..’ ही गीतेही सादर केली जाणार आहेत.

..
पाेर्ट ब्लेअर येथील हा सोहळा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरक इतिहासाला विनम्र अभिवादन आहे.
- अमेय हेटे, संचालक, व्हॅल्युएबल ग्रुप

.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

SCROLL FOR NEXT