मुंबई

बाइक रॅलीतून स्वच्छ समुद्र व पर्यावरणाचा संदेश

CD

बाइक रॅलीतून स्वच्छ समुद्र व पर्यावरणाचा संदेश
कासा, ता. ७ (बातमीदार) : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१A३, रिजन १ यांच्या वतीने शनिवारी (ता. ६) स्वच्छ समुद्र, सुरक्षित पर्यावरण आणि देशभक्ती असा त्रिवेणी संदेश देणारी भव्य बाइक रॅली उत्साहात पार पडली. सफाळे जलसार जेट्टीवरून सुरू झालेली ही रॅली सुमारे १६० किलोमीटरचे अंतर पार करत डहाणूपर्यंत पोहोचली.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मनोज बाबुर आणि सफाळे सागरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या रॅलीत सहभागी सदस्यांनी पिवळ्या जॅकेट्स आणि ‘राइड फॉर क्लीन सी’ अशा फलकांसह मार्गक्रमण केले.
रॅलीचे सागर टाका (डहाणू) येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. लायन्स क्लबचे अध्यक्ष भूपेन बारी यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांचे या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT