मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये संस्कृती कला महोत्सव

CD

भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : कला आणि संस्कृती यांचा अनोखा संगम साधणारा प्रताप सरनाईक फाउंडेशनद्वारा आयोजित संस्कृती कला महोत्सव १२ ते १५ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कला महोत्सवाची सायंकाळ सुरांनी न्हाऊन निघणार आहे. यानिमित्त नामवंत गायक आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला गायक शान यांच्या सुरेल स्वरांची मैफल सजणार आहे. दुसऱ्या दिवशी हास्यकवी, कलाकार शैलेंद्र लोढा आपल्या रचना सादर करणार आहेत. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी केवळ महाराष्ट्रातच नाही, तर परदेशातही गाजलेला लोककला बँड-द फोक आख्यान होणार आहे. चौथ्या दिवशी तरुणाईच्या गळ्यातील ताईत पार्श्वगायक स्टेबीन बेन महोत्सवाची रंगत आणखी खुलवणार आहे. शहराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक निगडिततेचे प्रतीक म्हणून राममंदिर ध्वजाची पवित्र प्रतिकृती महोत्सवाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या भव्य सांस्कृतिक रॅलीने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. हा महोत्सव सर्व नागरिकांसाठी मोफत आहे. याव्यतिरिक्त स्थानिक कलाकारांना वाव मिळावा, यासाठी महोत्सवात विविध मंच उपलब्ध असणार आहेत. त्यात मुद्रा मंच-भारतीय नृत्यभावनांचे विश्व, विरासत मंच-परंपरेचे जतन, कला-संस्कृतीचे दर्शन, बीट ट्रीट मंच-तरुणाईच्या तालावर धडकणारा ऊर्जावान ठेका, तसेच आर्ट गॅलरी, रांगोळी आणि छायाचित्र प्रदर्शने, सृजनशीलतेचे रंगमहाल आदी आकर्षणे महोत्सवात असणार आहेत.

शहराच्या विकासासोबतच शहरातील कलाकारांच्या कलांना व्यासपीठ देणे आणि नागरिकांना आनंदाचे क्षण देणे यासाठी कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT