मुंबई

सेंट फ्रान्सिस बोरीवली शाळेचा विद्यार्थी पर्व याला राष्ट्रीय पदक

CD

पर्व ठाकूर याला राष्ट्रीय सुवर्णपदक
विरार, ता. ७ (बातमीदार) : भारतीय शालेय खेळ महासंघ (एसजीएफआय) आयोजित ६९व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये बोरिवली येथील सेंट फ्रान्सिस शाळेचा विद्यार्थी पर्व नितेश ठाकूर याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
इंदूर येथे झालेल्या या स्पर्धेत पर्वने १४ वर्षे मुले वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि उंच उडी या खेळ प्रकारात १.८३ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदकाचा मान मिळवला. तसेच त्याने ८० मीटर हर्डल प्रकारात सहावा क्रमांक पटकावला.
पर्वने या वर्षात तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण १४ सुवर्णपदके, दोन रौप्यपदके आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. त्याला नारायण पिसाळ आणि विद्या प्रसारक मंडळ स्पोर्ट्स क्लबचे क्रीडा तज्ज्ञ वैभव जाधव व संतोष आंब्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सततचा सराव, अथक परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाले, असे सांगत पर्वने भविष्यात क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्याचा मानस व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

Nashik Municipal Corporation : नाशिककरांनो सावधान! महापालिकेच्या सर्वेक्षणात दीड लाखांहून अधिक नळजोडण्या आढळल्या नियमबाह्य

Jim Corbett: जिम कॉर्बेटचा हाऊसफुल्ल! बुकिंग उघडताच काही मिनिटांत ४१ खोल्या बुक; करावी लागतेय वर्षभर प्रतीक्षा!

Ratnagiri Farmer : जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका; विचित्र; वातावरण, कमाल तापमान ३८ अंशांवर, बागायतदार चिंतेत

SCROLL FOR NEXT