मुंबई

दिवा शहरात शिवसेनेचे विशेष ''पाणी अभियान'' सुरू

CD

दिवा शहरात शिवसेनेचे विशेष पाणी अभियान सुरू
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : दिवा शहरातील नागरिकांना भेडसावणारी अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आणि नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. स्वच्छ आणि मुबलक पाणी, आपला अधिकार या प्रमुख उद्देशाने दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी एका विशेष अभियानाची घोषणा केली असून, या माध्यमातून प्रशासनावर दबाव निर्माण केला जाणार आहे.
दिवा शहराची लोकसंख्या वाढत असली तरी, त्या प्रमाणात पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम नसल्याने नागरिकांना अनेकदा पाणीटंचाई आणि गढूळ पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, ज्योती पाटील यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी पुढाकार घेतला आहे. दिवा शहरातील प्रत्येक नागरिकाला दररोज स्वच्छ आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, हे या अभियानाचे मुख्य ध्येय आहे. दरम्यान, या जनहितकारी अभियानामुळे दिवावासियांना पाणी समस्येतून लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिकांना तक्रारी नोंदवण्याचे आवाहन
या विशेष अभियानअंतर्गत, त्यांच्या परिसरात किंवा सोसायटीमध्ये पाण्याबाबत कोणत्याही समस्या असल्यास (उदा. कमी दाबाने पाणी येणे, गढूळ पाणी, अनियमित वेळ), त्यांनी आपल्या लेखी तक्रारी ठाकरे पक्षाच्या स्थानिक कार्यालयात जमा कराव्यात, असे आवाहन ज्योती पाटील यांनी दिवा शहरातील सर्व नागरिकांना आणि विशेषतः गृहिणींना केले आहे.

प्रशासनाकडे पाठपुरावा
नागरिकांकडून आलेल्या या तक्रारींचे एकत्रीकरण करून, ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीचे शिष्टमंडळ संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. केवळ निवेदन देऊन न थांबता, जोपर्यंत नागरिकांचा पाणीप्रश्न प्रत्यक्षात सुटत नाही, तोपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT