मुंबई

डहाणू तालुक्यात शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित

CD

कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. याचा परिणाम म्हणून त्यांना पीक नुकसानभरपाई मिळण्यात अडथळे येत आहेत. तालुक्यात अजूनही २,७०० शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे. शेतकऱ्यांची नावे प्रलंबित यादीत असल्याने प्रशासनाने ग्रामपंचायतींना आपल्या स्तरावरून त्वरित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या प्रत्येक गावात ई-केवायसी शिबिर सुरू करण्यात आले असून संबंधित कागदपत्रांसह शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यासच पीक नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत, तलाठी व कृषी विभाग यांनी समन्वय साधून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही विलंब न करता ई-केवायसी करून घेऊन सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT