मुंबई

बनावट लोगो वापरून पाईपची विक्री

CD

बनावट लोगो वापरून पाइपची विक्री
उल्हासनगरमध्ये तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : निओ लॉजिस्टिक पार्क, उसाटणे गाव येथे एका प्रतिष्ठित कंपनीचा बनावट लोगो वापरून पाइपची विक्री करणाऱ्या तीन जणांविरोधात उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाटा मेटल्स इंडस्ट्रीज आणि एस. व्ही. एम. पाइप्स ॲण्ड ट्युब्स प्रा. लि., निओ लॉजिस्टिक पार्क या ठिकाणी कारवाई करण्यात आली. आरोपींनी महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड या कंपनीचा बनावट लोगो वापरला. पोलिसांनी तपासणी केली असता, आरोपींनी महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडचा बनावट लोगो वापरलेले तब्बल २९ पाइप्स विक्रीसाठी ठेवल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी फिर्यादी मधुकर मुरलीधर आमराव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विक्रम सवाराम सोलंकी, नरपत भवानीसिंग सोधा आणि प्रताप पुरोहीत या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी संगनमत करून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना कंपनीचा लोगो वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हिललाइन पोलिस या फसवणूक प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, या दिशेने अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: 'अभिषेक शर्माला खेळवा, कारण आम्हाला...', पाकिस्तानी कर्णधाराचं थेट आव्हान; हँडशेकबद्दलही बोलला

"48 तासांत राहतं घर आणि अकरा गाड्या गमावल्या.." राणादाने सांगितली आयुष्यातील 'ती' अत्यंत वाईट आठवण

Mhada: मुंबईत घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी! म्हाडा ५००० घरांसाठी लॉटरी काढणार; पण कधी? तारीख आली समोर

महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल! खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना काढून टाकणार; एकनाथ शिंदेंचे संकेत, पाहा संभाव्य यादी

Rahul Narvekar Video: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पळ का काढला? दादागिरी करुन शेत मोजणीचं काम? नार्वेकर म्हणतात...

SCROLL FOR NEXT