मुंबई

जलप्रवासाचे वेळापत्रक कोलमडले

CD

जलप्रवासाचे वेळापत्रक कोलमडले
मोरा जेट्टीतील गाळामुळे नोकरदारांना फटका
उरण, ता. ८ (वार्ताहर)ः ओहोटीच्या काळात मोरा बंदरात साचणाऱ्या गाळामुळे उरण-मोरा ते मुंबई भाऊचा धक्का, मुंबई ते उरण जलप्रवासाचे वेळापत्रक वारंवार कोलमडत आहे. त्याचा फटका नोकरदरांना बसत असून, कामाला दांडी मारावी लागत आहे.
उरण मोरा ते मुंबई प्रवास करताना प्रवाशांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यात मोरा बंदरात साचलेला गाळ विविध अडचणी निर्माण करत आहे. या बंदरातील गाळ काढण्यासाठी लाखो रुपयांचा निधीतून खर्च करण्यात आला आहे, परंतु गाळ साचण्याची समस्या कायम आहे. ओहोटीच्या वेळी मोरा बंदरात चिखल जास्त असल्याने जलवाहतूक, औद्योगिक सहकारी संस्थेच्या बोटी काही तास बंद असतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्या खासगी कंपनीत काम करणाऱ्यां महिन्यातून तीन ते चार दिवस लेटमार्क, तर कधी कार्यालयीन सुट्टी घ्यावी लागत आहे.
-----------------------------------
अडचणींचा फेरा
अनियमित वेळापत्रकामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आजारी व्यक्तींना, उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना, महत्त्वाच्या कामाला जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. त्यामुळे गाळाची समस्या सोडवण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करून गाळ काढावा किंवा बंदराची लांबी वाढवावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT