मुंबई

बॅनरबाजीमुळे सौंदर्ययीकरण लयास.

CD

बॅनरबाजीमुळे कांदिवलीचे सौंदर्यकरण लयाला
न्यायालयाचे आदेश धुडकावून विद्रुपीकरणात वाढ
कांदिवली, ता. ७ (बातमीदार) : परिसरात राजकीय पक्ष, मंडळे, संस्था आणि विकासक यांच्याकडून प्रसिद्धीसाठी सर्रास बॅनरबाजी केली जात आहे. यामुळे लाखो रुपये खर्च करून सुशोभित केलेले चौक, दुभाजक, स्कायवॉक आणि विजेचे खांब विद्रूप झाले आहेत. न्यायालयाचे आदेश असूनही यावर ठोस उपाययोजना किंवा कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या बॅनरमुळे अनेक ठिकाणी मोठे ‘बांबूचे ढाचे’ उभे केले जातात. यामुळे वाहनचालकांना सिग्नल पाहण्यातही अडचण येत आहे. पालिका कर्मचारी बॅनर काढतात आणि तक्रारींची नोंद करतात, पण लगेच पुन्हा बॅनर लावले जातात. बॅनरवर मंत्री, खासदार, आमदारांचे फोटो असल्याने अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. ज्या व्यक्ती, पक्ष किंवा संस्थांच्या नावाचे बॅनर असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.
---------------------------
बॅनरबाजीमुळे करोडो रुपये खर्च केलेल्या सुशोभीकरणासह संपूर्ण परिसराचे विद्रुपीकरण गेली कित्येक वर्ष होत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढल्याशिवाय पर्याय नाही.
- मनोज गिरीधर, सामाजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, पकोडे आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाने 62 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT