मुंबई

शनिनगरचा नाला बनला कचराकुंडी

CD

शनिनगरचा नाला बनला कचराकुंडी
नागरिकांच्या आरोग्याला धोका

बदलापूर, ता. ८ (बातमीदार) : पावसाळा ओसरताच बदलापूर पश्चिमेतील शनिनगर परिसरातील सर्वात मोठ्या नाल्याचे कचराकुंडीत रूपांतर झाले आहे. प्लॅस्टिक, घरगुती कचरा, बांधकामाच्या टाकाऊ मालासह सर्व प्रकारचा कचरा थेट नाल्यात टाकला जात असल्याचे उघड झाले आहे. शहरातील अनेक नाले आधीच अरुंद केले आहेत. त्यात उरलेल्या नाल्यांचीही दुरवस्था झाली आहे. पालिकेकडून स्वच्छता सुरू असल्याचे सांगितले जात आहे; मात्र नाल्यांमध्ये इतका कचरा कसा साचला, असा सवाल नागरिक करीत आहेत. नाल्यातील साचलेल्या कचऱ्यामुळे वाहतूकमार्गातही अडथळे येत असून, भविष्यात आणखी गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नाल्यातील कचऱ्याचा प्रचंड ढीग हा फक्त स्वच्छतेचा प्रश्न नसून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका पोहोचवत आहे. परिसरात डास व कीटकांचा त्रास प्रचंड वाढला असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे. पावसाळ्यापूर्वी जशी नालेसफाई केली जाते. तशीच पावसाळ्यानंतर देखभाल केली जात नाही, याबद्दल नागरिकांत नाराजी आहे. कचरा टाकणाऱ्यांवर ठोस कारवाई का केली जात नाही? आणि नाल्यांची नियमित देखभाल का होत नाही? असा थेट सवाल नागरिकांनी पालिका प्रशासनाला केला आहे. शनिनगरसह संपूर्ण पश्चिम बदलापूरमधील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने प्रशासनाची कार्यक्षमता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे.

कारवाईचे आश्वासन
शनिनगर येथील नाल्यात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या संदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या ठिकाणी पालिकेचे तातडीने सफाई कर्मचारी नेमून, संपूर्ण स्वच्छता केली जाईल व यापुढे या ठिकाणी कचरा साचू नये यासाठी दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात ठोस पाऊल उचलले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT