मुंबई

पान३ पट्टा

CD

स्वतंत्र जलकुंभ उभारण्याची मागणी
खारघर (बातमीदार) : खारघर वसाहतीमधील सर्वात मोठा सेक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेक्टर १२ मधील रहिवाशांसाठी स्वतंत्र जलकुंभ उभारण्याची मागणी सिडको प्रशासनाकडे करण्यात आली आहे. खारघर परिसरातील सर्वात मोठा नोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर सेक्टर- १२ मध्ये सिडकोने बियुडीपी वसाहत अंतर्गत गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंबीयांना घरे उपलब्ध करून दिली आहेत. या सेक्टरमध्ये बैठ्या चाळी असून, लोकसंख्या ४० हजारांच्या घरात आहे. विहीर आणि कूपनलिकेच्या पाण्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींना उलटी, जुलाबसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र जलकुंभ उभारण्याची मागणी खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव मीनल पाटील, खारघर सेक्टर १२ एबीसीडीईएफजी रहिवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
-----------------------------------
क्रीडांगणाच्या दुरवस्थेने रहिवासी नाराज
नेरूळ (बातमीदार)ः नेरूळ सेक्टर ६ परिसरात महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रीडांगण आहे. या मैदानावर बाराही महिने बकालपणा असतो. या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. स्थानिक रहिवाशांसाठी एकमेव मैदान आहे. यामुळे मैदान, उद्यानात येणाऱ्या नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. मैदानातील समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई पालिकेकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने स्थानिकांनी पालिका विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच समस्यांचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Beed Crime : बीडमध्ये खळबळ! माजी सभापतीच्या मुलाने विवाहितेला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार; 'या' कारणामुळे घाबरली होती महिला

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

SCROLL FOR NEXT