मुंबई

आपला दवाखाना योजनेत भ्रष्टाचार?

CD

भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : भिवंडी पालिका कार्यक्षेत्रात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेंतर्गत सुरू असलेल्या दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लोकजनक्रांती मानवी अधिकार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश जाधव यांनी आयुक्तांसह सरकारकडे निवेदनाद्वारे केला आहे. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बोगस रुग्ण नोंदी करून कोणतीही सेवा न देता देयक काढले आहेत. पालिकेसोबत केलेल्या करारानुसार जास्त जागा दाखवून कमी जागेत हे दवाखाने सुरू आहेत. यात सरकारच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी पारदर्शक चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भिवंडी पालिका क्षेत्रात सध्या १० आपला दवाखाने चालू असून दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना सेवा दिली जाते. या दवाखान्यांचे परिचालन आरोग्य साथी फाउंडेशन या अशासकीय संस्थेला सोपवण्यात आले आहे. मात्र, संस्थेकडून बोगस रुग्ण नोंदी, कोणतीही प्रत्यक्ष सेवा न देता देयके काढणे, तसेच कमी जागेत दवाखाने सुरू करून कराराचा भंग केल्याबाबत नागरिक धम्मरत्न नवनाथ कांबळे यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित संस्थेचे संचालक विशाल प्रदीप बोडके आणि पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची मागणी ॲड. जाधव यांनी केली आहे. विशेष म्हणजे, आपला दवाखाना योजना चालवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे कार्यालय असलेली इमारत ही संस्थेच्या मालकीची असणे बंधनकारक आहे. परंतु कोणतीही खात्री न करता फाउंडेशनशी करार करण्यात आला. त्यामुळे हा करार कायद्याच्या दृष्टीने बेकायदा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शासनस्तरावर ॲड. जाधव यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आरोग्य सेवा व अभियान संचालक विभागाने पालिका आयुक्तांना १४ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात डॉ. संदीप गाडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

SCROLL FOR NEXT