मुंबई

मुलुंड वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई

CD

बेशिस्त वाहनचालकांना चाप
मुलुंड वाहतूक पोलिसांची कारवाई; १७ लाखांहून अधिक दंड वसूल
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) : मुलुंड वाहतूक पोलिसांनी बेशिस्त दुचाकीस्वार आणि वाहनचालकांविरुद्ध जोरदार मोहीम उघडून कडक दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना चांगलीच चपराक बसली आहे. मुलुंड वाहतूक पोलिसांनी १ ते ३० नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीत ८,४८१ वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत त्यांनी १७ लाख ४२ हजार ५५० दंड वसूल केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड वाहतूक पोलिसांनी अनेक प्रकारच्या नियमभंग करणाऱ्यांवर मोटार वाहन नियमांनुसार कारवाई केली आहे. प्रवाशांना इच्छितस्थळी नेण्यास नकार देणाऱ्या रिक्षाचालकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. चुकीच्या ठिकाणी आणि प्रतिबंधित ठिकाणी गाड्या पार्क करणे, पदपथावर दुचाकी अथवा चारचाकी चालवणे किंवा पार्क करणे, चुकीच्या पद्धतीने गाडी ओव्हरटेक केल्यावर कारवाई करण्यात येत आहे. मुलुंड वाहतूक पोलिस विभागाने ही दंडात्मक कारवाई सध्याही सुरू ठेवली असून, यापुढेही वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा पेच; परवान्याअभावी शेतकऱ्यांसमोर अडचणींचे सावट

SCROLL FOR NEXT