मुंबई

ठाकुर्ली–डोंबिवली परिसरात फेरीवाल्यांचं अतिक्रमण

CD

स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा विळखा
वाहतूक कोंडीची समस्या; वाट काढणेही मुश्कील
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ ः ठाकुर्ली आणि डोंबिवली स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, याचा पादचारी, वाहनचालक, विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अधिकृत भाजी मंडई ओस पडलेली असताना रस्ते आणि पदपथांवर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
स्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांना मनाई असतानाही नियम धाब्यावर बसवून खुलेआम व्यापार सुरू आहे.
स्थानक परिसरातील उभारलेली भाजी मंडई सध्या सरकारी कार्यालय म्हणून वापरली जात आहे. यामुळे फडके रोड, स्थानक चौक, बसथांबे परिसरात दोन्ही बाजूंना अनधिकृत फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय थाटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याशिवाय रुग्णवाहिका, सार्वजनिक वाहतूक आणि सामान्य नागरिक यांना या गर्दीतून वाट काढणेही कठीण झाले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजी मंडईचा वापर सरकारी कार्यालय म्हणून होत असल्याने तिचा मूळ उद्देश पूर्ण होत नाही. रहिवाशांचे म्हणणे आहे की, जर या मंडईतच फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले गेले, तर गर्दीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल आणि पादचाऱ्यांना मोकळा रस्ता मिळेल.

अतिक्रमणे हटवण्याची मागणी
स्थानिकांनी प्रशासनाला फेरीवाला धोरण काटेकोरपणे अमलात आणण्याची, भाजी मंडईचा वापर मूळ उद्देशानुसार करण्याची आणि स्थानक परिसरातून अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. नियम आहेत, पण अंमलबजावणी नाही, तोपर्यंत गोंधळ थांबणार नाही, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT