मुंबई

किडनी आणि पित्ताशयातील खडे; कामा रुग्णालयातून रेफर झाल्यानंतर जेजेत मिळाला निर्णायक उपचार

CD

जे. जे. रुग्णालयात दुहेरी रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी
७४ वर्षीय रुग्ण तिसऱ्याच दिवशी घरी!
मुंबई, ता. ८ : जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. ७४ वर्षीय सरस्वती यांच्यावर एकाच वेळी किडनी काढणे (नेफ्रोक्टोमी) आणि पित्ताशयातील खडे काढण्याची (कोलेसिस्टेक्टॉमी) दुहेरी रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या जटिल शस्त्रक्रियेनंतर केवळ तिसऱ्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून तीव्र पोटदुखी, कंबरेपासून जांघेकडे वाढणारी वेदना आणि वारंवार होणाऱ्या उलटीच्या तक्रारींमुळे सरस्वती विविध रुग्णालयांमध्ये फिरत होत्या.

जे. जे. रुग्णालयात दाखल झाल्यावर तपासणीत उजवी किडनी पूर्णपणे निष्क्रिय व पित्ताशयात खडे असल्याचे आढळले. २०२५ मध्ये त्यांच्यावर पित्तनलिकेतील समस्या तपासण्यासाठी ईआरसीपी प्रक्रिया करण्यात आली होती. रुग्णाची प्रकृती स्थिर असूनही, उपचारासाठी इलेक्टिव्ह नेफ्रोक्टोमी (निष्क्रिय किडनी काढणे) आवश्यक होती; मात्र रुग्णाचे वाढलेले वय, निष्क्रिय किडनीवरील वाढलेला परिणाम आणि पित्ताशयातील खडे या त्रिकुटाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक ओपन शस्त्रक्रियेत गुंतागुंतीचा धोका खूप मोठा होता. यामुळे, उपचार पथकाने अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे प्रक्रिया अधिक अचूक आणि कमी जोखमीची झाली.

दुहेरी शस्त्रक्रियेची प्रक्रिया
पायरी १ (रोबोटिक नेफ्रोक्टोमी) : प्रथम रोबोटिक पद्धतीने निष्क्रिय किडनीचे अत्यंत नेमके डिसेक्शन करून ती काढण्यात आली.
पायरी २ (रोबोटिक कोलेसिस्टेक्टॉमी) : त्यानंतर रोबोटिक आर्म्सच्या विशेष पोझिशनिंगद्वारे पित्ताशय काढून टाकण्यात आले.

शस्त्रक्रियेचे महत्त्व
रुग्णाचे वय, उपचारात झालेला विलंब आणि अनेक समस्या एकाच वेळी हाताळायच्या असल्याने रोबोटिक तंत्रज्ञानाने केलेली ही दुहेरी शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. तज्ज्ञांच्या मते, रोबोटिक प्रणालीमुळे नाजूक अवयवांवरील प्रक्रिया अधिक अचूक होते आणि गुंतागुंतीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. रुग्णालय अधिष्ठाता आणि शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. अजय भंडारवार, प्राध्यापक डॉ. गिरीश बक्षी आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

आरोग्यसेवेला बळ
डॉ. अमोल वाघ यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयात या प्रकारच्या दुहेरी शस्त्रक्रियेचा खर्च सात ते आठ लाख रुपयांपेक्षा अधिक आला असता, मात्र जे. जे. रुग्णालयात ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य करण्यात आली. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा वाढता वापर रुग्णसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित बनवत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : कल्ला होणार... CSK संजू, सर्फराज यांच्यासह ५ खेळाडूंना पदार्पणाची संधी देणार, आयपीएल गाजवणार

IDBI बँकेत १३०० पदांसाठी मोठी भरती; पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

SCROLL FOR NEXT