मुंबई

मशालीला घेऊन तुतारी वाजवा

CD

मशालीला घेऊन तुतारी वाजवा
शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचे आवाहन
वाशी, ता. ९ (बातमीदार) ः ऐरोली सेक्टर १६ येथे आई फाउंडेशनच्या संकल्पनेतून महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यात ऐरोलीमध्ये मशालीला घेऊन तुतारी वाजवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्ष संपला असल्याचे बोलले जात आहे; पण कोणताही पक्ष संपत नसून तो पुन्हा उभा राहतो. महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आता पक्षात डॉक्टर, इंजिनिअरसारख्या सुशिक्षित लोकांनी पक्ष सोडल्याचे शिंदे म्हणाले. सध्या देशांमध्ये विमानांचा घोळ सुरू असून एका व्यक्तीच्या हाती यंत्रणा दिल्यामुळे परिणाम काय होतो, याचे इंडिगोच्या सेवेमुळे समोर येत आहे. देशातील मोठे दोन उद्योजक अडचणीत आले तर अख्खा देश अडचणीत येऊ शकतो, असे संकेत काही वर्षांमध्ये येत असल्याचे शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून बिहारमध्ये परिवर्तन झाले, महाराष्ट्रामध्ये झाले; पण एक दिवस सामान्य जनतेचे सरकार येईल, सरकार उभे करण्यासाठी पाया मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी महिलांना एक संधी द्यावी, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले.
-------------------------------
नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले, माजी नगसेवक एम. के. मढवी, विनया मढवी आदी उपस्थित होते. या वेळी महिलांसाठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Microsoft India Investment : 'मायक्रोसॉफ्ट' भारतात दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार; सत्या नडेलांची मोठी घोषणा!

Dhananjay Munde: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी 35 वकिलांची फौज; पैसा कोण पुरवतंय? कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड- एकनाथ शिंदे

Mumbai News: रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय! मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Central Railway: नाताळ-नववर्षासाठी मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या; पण कोणत्या मार्गावर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT