मुंबई

विमान प्रवाशांना रेल्वेचा आधार

CD

विमान प्रवाशांना रेल्वेचा आधार
‘इंडिगो’ची उड्डाणे रद्द; रेल्वेने १६ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : इंडिगो एअरलाइन्सच्या विमानसेवा विस्कळित झाल्याने देशभरातील हजारो विमानप्रवासी अडचणीत सापडले असताना, भारतीय रेल्वेने तातडीने पुढाकार घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे. मध्य रेल्वेसह विविध विभागांनी देशातील महत्त्वाच्या मार्गांवर २२ विशेष गाड्या चालविल्या, तर नियमित लांब पल्ल्याच्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांची वाढती गर्दी सामावून घेण्यात आली. या व्यवस्थेला प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अप-डाऊन मार्गांवर १६ हजारांहून अधिक प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेने चालविलेल्या विशेष गाड्यांपैकी हावडा-सीएसएमटी विशेष गाडीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

मध्य रेल्वेने ६ डिसेंबरला सात गाड्या, ७ डिसेंबरला ११ आणि रविवारी चार अशा एकूण २२ विशेष एक्स्प्रेस गाड्या चालवल्या. या गाड्यांमध्ये सुमारे २० हजार तिकिटांची उपलब्धता होती. त्यापैकी जवळपास १७ हजार तिकिटांची विक्री झाली, तर सरासरी आरक्षण ८१ टक्क्यांवर पोहोचले आहे. विमानसेवा बाधित झाल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय निवडत या विशेष गाड्यांचा लाभ घेतल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. ‘आयआरसीटीसी’च्या आकडेवारीनुसार रविवारी (ता. ७) सायंकाळपर्यंत बहुतांश विशेष गाड्यांमध्ये चांगले आरक्षण नोंदवले गेले. त्याचवेळी वंदे भारत, शताब्दी, राजधानी आणि तेजस एक्स्प्रेससारख्या या प्रीमियम गाड्या पूर्ण क्षमतेने धावत असल्याचेही स्पष्ट झाले. पुणे-बंगळूर मार्गासह अनेक प्रमुख मार्गांवर नियमित गाड्यांना मोठी मागणी असून, प्रवाशांनी रेल्वेवरच अधिक विश्वास दाखविला आहे.


विमानतळांवर रेल्वेचे मदत केंद्र
इंडिगोची उड्डाणे रद्द झाल्यानंतर मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ आणि २ येथे आयआरसीटीसी, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या संयुक्त रेल्वे मदत केंद्रांची उभारणी करण्यात आली. या केंद्रांवर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर भेट देत उपलब्ध गाड्या, प्रवासाचे पर्याय आणि अडकलेल्या सामानाबाबत माहिती घेतली. अनेक प्रवाशांनी येथील मार्गदर्शनाच्या आधारे आपले पुढील प्रवासाचे नियोजन केले.

अडचणीतूनही रेल्वेचा पर्याय
विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांमध्ये कोलकात्याचे हंसिफ कुमार यांचाही समावेश आहे. ते कुटुंबासह एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. इंडिगोचे उड्डाण रद्द झाल्यानंतर इतर विमानसेवांचे तिकीट महाग असल्याने त्यांनी रेल्वेचा पर्याय निवडला. त्यांनी सांगितले की, ‘आम्ही आठ जण एका हॉटेलमध्ये राहात होतो. आणखी मुक्काम शक्य नव्हता. विमानतळावर सामान आधीच चेक-इन केले होते आणि ते रविवारी मिळाले. सामान मिळाल्यानंतर ट्रेनचे तिकीट बुक करण्याचा निर्णय घेतला.’ विमानाने अडीच तासांचा प्रवास असला तरी, अडचणीच्या काळात रेल्वेचा सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवास शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

SCROLL FOR NEXT