मुंबई

भिवंडीत साडेसोळा लाखांचा गुटखा जप्त

CD

भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी गुन्हे शाखेने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल साडेसोळा लाखांचा गुटखा जप्त केला आहे. यापैकी एका प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
राज्य सरकारने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा इत्यादी पदार्थ मानवाच्या आरोग्यास अत्यंत घातक असल्याने त्यांची साठवण व विक्री प्रतिबंधित केली आहे. तरीही बेकायदा साठा ठेवला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. ५ डिसेंबरला रात्री ११ वाजता पथकाने बशर कॉम्प्लेक्स, गाळा क्र. ४, मोहम्मदिया मशिदीजवळ, किडवाई नगर, नागाव येथे छापा टाकला. येथे गुल मोहम्मद सुफियान अहमद खान यांनी ७,७५,२८५ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याचे उघड झाले. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला. यानंतर गुन्हे शाखेने नागाव परिसरातील मकसद भाईची दुमजली इमारत येथे छापा टाकला. तळमजल्यावरील गाळ्यात आबदान मोहम्मद अन्सारी यांनी ८,७६,५४० रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित पान मसाला व तंबाखू साठवून ठेवल्याचे आढळले. अन्सारीला ताब्यात घेतले असून साठा जप्त केला आहे. दोन्ही प्रकरणांत शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT