मुंबई

अभिनेता-दिग्दर्शक बबन जोशी यांचे निधन

CD

अभिनेता-दिग्दर्शक बबन जोशी यांचे निधन

मुंबई, ता. ८ : रंगभूमीसह मालिका व चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते व दिग्दर्शक बबन जोशी यांचे रविवारी (ता. ७) रात्री निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. ८) दुपारी कामाठीपुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. जोशी यांनी अनेक नाटकं, मालिका आणि लघुपटांमध्ये काम केले. स्वतःच्या ‘अनमोल चित्र प्रॉडक्शन’ या बॅनरखाली त्यांनी अनेक लघुपटांचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केला होता. ‘योगा योग’, तसेच ‘हरवलेलं उत्तर’ या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जल बीन’ या लघुपटाला ‘आर्यारवी एन्टरटेन्मेंट पुरस्कार’ मिळाला होता. कलाक्षेत्रात झोकून देत महापालिकेच्या नोकरीसोबत त्यांनी आपली कला जपली. त्यांना जनहित फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट कलाकार हा पुरस्कारसुद्धा मिळाला होता. मूळचे कोकणातील मुळशी तालुक्यातील ओशिवळा गावचे असलेल्या बबन जोशी यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT