मुंबई

शाळा परिसरात गुटखा, तंबाखूविक्री थांबवा

CD

शाळा परिसरात गुटखा, तंबाखूविक्री थांबवा
आमदार प्रशांत ठाकूर यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
पनवेल, ता. ९ (बातमीदार) ः राज्यातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, तंबाखू, अमली पदार्थांची विक्री वाढली आहे. या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी हिवाळी अधिवेशनात केली.
राज्यातील विविध विभागांतून शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर १०० मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपऱ्या, जनरल स्टोअर्स, किराणा दुकानांवर कारवाईसाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र पथकाची रचना, कार्यपद्धती, जबाबदाऱ्या आणि संपर्क क्रमांकांबाबत कोणतीही माहिती नसल्याने आदेशांच्या अंमलबजावणीबाबत ठाकूर यांनी शंका व्यक्त केली आहे. याचबरोबर प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात संबंधित पथकांची नावे, संपर्क क्रमांक तसेच तक्रार नोंदणीचे अधिकृत क्रमांक दर्शविणारे सूचनाफलक लावणे बंधनकारक करावे, अशी मागणीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

SCROLL FOR NEXT