मुंबई

नाइट क्लबमध्ये अग्निसुरक्षेची तपासणी करा

CD

नाइट क्लबमध्ये अग्निसुरक्षेची तपासणी करा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन

घाटकोपर, ता. ९, (बातमीदार) : गोव्यातील एका नाइट क्लबमध्ये भीषण आगीच्या घटनेत २५ निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अलीकडेच घडली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नाइट क्लब व मनोरंजन स्थळांवर नियमित अग्निसुरक्षेची तपासणी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांनी आज केली. या मागणीचे निवेदन त्यांनी प्रमुख अग्निशामक अधिकारी यांना दिले.
युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष अमोल मातेले, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, तालुकाध्यक्ष सुयोग भुजबळ, मुंबई सचिव ब्लेस डिसोजा व कलिना तालुका उपाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका कार्यालयात जाऊन हे निवेदन दिले.

प्रमुख मागण्या

मुंबईतील नाइट क्लब व मनोरंजन स्थळांवर त्वरित आणि नियमित अग्निसुरक्षेची तपासणी करावी, अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, भविष्यात आगीच्या घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे, अशा मागण्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार! २००० रुपये खात्यात जमा, २२वा हप्ता देत पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य

बिग बॉस नंतर आयुष संजीवची नवी इनींग ! 'या' गाण्याचं केलं दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी

Fridge Vastu Tips: फ्रिजच्यावर 'या' 3 गोष्टी ठेवू नका, अन्यथा निर्माण होतात वास्तुदोष

Latest Marathi News Live Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

Akola News: बहिणीच्या विरहात भावाचा जीव गेला; अंत्यसंस्कारानंतरच हृदयविकाराचा झटका

SCROLL FOR NEXT