मुंबई

मोकळ्या भूखंडांवर उंदरांचे राज्य

CD

मोकळ्या भूखंडांवर उंदरांचे राज्य
सिडकोच्या वसाहतीमधील रहिवासी हैराण
खारघर, ता. १० (बातमीदार) : वसाहतीमधील सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमणे केली आहेत. अनेकांनी सिमेंट, खडी, गॅरेज, भंगार व्यवसाय थाटले आहेत. या साहित्यांमुळे उंदरांचा उपद्रव वाढल्याने रहिवासी हैराण आहेत.
खारघर शहर विकसित करताना सिडकोने बहुतांश सेक्टरमध्ये भूखंड राखीव ठेवले आहेत. काही भूखंडावर सिडकोने फलक लावले आहेत. काहींनी फलक हटवून भूखंडावर रेती, सिमेंट, खडी विक्री व्यवसाय तर काहींनी गॅरेज, भंगारचे व्यवसाय थाटले आहेत. मोकळ्या भूखंडावर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे उंदरांचा वावर वाढला आहे. तसेच अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रोगराईची भीती आहे. विशेष म्हणजे, सिडकोच्या भूखंडावर भंगारमाफियांनी अतिक्रमण करून खुलेआम व्यवसाय थाटले आहेत; मात्र अतिक्रमण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. यासंदर्भात मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्याशी संपर्क झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

SCROLL FOR NEXT