मुंबई

डहाणू–तलासरीतील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक उघड

CD

डहाणू-तलासरीतील शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक
गुंतवणूक कंपनीविरोधात शनिवारपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा
कासा, ता. १० (बातमीदार) ः डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना आकर्षक परताव्याचे प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप मातृभूमी रिअल टच डेव्हलपमेंट लिमिटेड या गुंतवणूक कंपनीवर वाकी-झारलीपाडा येथील चंद्रकांत घोरखना यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी पोलिस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांच्या उदासीनतेविरोधात आवाज उठवत घोरखना यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली शनिवार (ता. १३)पासून डहाणू पोलिस ठाण्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनावर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत डहाणू पोलिस ठाण्याचे अधिकारी किरण पवार यांनी प्रकरणाची चौकशी सुरू असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. या घटनेमुळे डहाणू-तलासरीतील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

काय आहे प्रकरण?
डहाणू, तलासरी, बोईसर, आगर, रामपूरसह अनेक परिसरातील व्यक्तींनी स्वतःला कंपनीचे टीम लीडर व ब्रँच मॅनेजर म्हणून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा केली. कंपनी नामांकित व सुरक्षित असल्याचे भासवत ही फसवणूक करण्यात आली. घोरखना यांनी २९ जुलै २०१९ रोजीच तक्रार दाखल केली होती; परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT