मुंबई

मिरा-भाईंदर लवकरच ‘वाय फाय शहर’

CD

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : इंटरनेटच्या मायाजालाची लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ पडली आहे. इंटरनेटचा वापर करत नाही, अशी व्यक्ती शहरात तरी अभावानेच आढळून येईल. आधुनिक जगाचे इंटरनेटचे आकर्षण लक्षात घेऊन मिरा-भाईंदर शहरात सार्वजनिक ठिकाणी लवकरच वाय-फायची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सध्या मिरा-भाईंदर शहरात बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून संपूर्ण शहरावर लक्ष ठेवणे शक्य सोपे आहे. आता पुढचे पाऊल म्हणून महापालिकेकडून शहरात वाय-फाय सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी ही यंत्रणा उपलब्ध असणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उदयोन्मुख शहरांना ‘फ्री वाय-फाय’ची जोड देण्याचे अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने मिरा-भाईंदर महापालिकेनेदेखील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका मुख्यालय, जास्त वर्दळ असणारे शहरातील नाके, चौक, मंडई आदी ठिकाणी ही सुविधा देण्यात येणार आहे. यासंदर्भात इंटरनेटचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी महापालिकेने चर्चा सुरू केली असून कंपन्यांसोबत एक बैठक लवकरच होणार आहे. त्यानंतर या कंपन्यांकडून वाय-फाय सुविधा देण्याबाबत देकार मागविण्यात येणार आहेत.

अर्थसंकल्पामध्ये तरतूद
ही वाय-फाय सुविधा नागरिकांना मोफत द्यायची, त्याकरता शुल्क आकारायचे की मर्यादित इंटरनेट मोफत द्यायचे, याचा निर्णय इंटरनेट कंपन्यांकडून येणाऱ्या देकारावर अवलंबून असणार आहे. महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात माहिती तंत्रज्ञानासाठी विशिष्ट रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून वाय-फाय सुविधेवरील खर्च करण्यात येणार आहे.

इंटरनेट हे आज जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा देण्यासोबतच नागरिकांना वाय-फायसारखी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT