मुंबई

कलानी समर्थकावर धारदार शस्त्राने हल्ला

CD

उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प २ मधील ढोलूराम मंदिर परिसरात टीम ओमी कलानीच्या समर्थकावर झालेल्या चाकूहल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. केवळ गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद पेटला आणि पाहता पाहता रक्तरंजित हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगर कॅम्प २ मधील ढोलूराम मंदिर परिसरात टीम ओमी कलानीचे समर्थक जयकिशन आलमचंदानी उर्फ जॅकी यांच्यावर झालेल्या चाकू हल्ला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलमचंदानी हे ढोलूराम दरबार परिसरातून मोटारसायकलवरून जात होते. याच वेळी समोरून आलेल्या कारमधून दोन व्यक्ती उतरले आणि मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. अल्पावधीतच वाद हातघाईपर्यंत पोहोचला. कारमधील एकाने धारदार शस्त्र काढत आलमचंदानी यांच्यावर हल्ला चढवला. पोटावर आणि पाठीवर असे एकूण तीन वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले.

पोलिसांकडून तपास सुरू
नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड आणि निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

SCROLL FOR NEXT