मुंबई

घरकाम करणाऱ्या महिलेवर बंदुकीसारखे दिसणाऱ्या लाईटर रोखले

CD

महिलेला बंदुकीसारखा लायटर दाखवून मायलेकाकडून धमकी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० ः क्षुल्लक कारणातून मायलेकाने घरकाम करणाऱ्या महिलेला बंदुकीसारखे दिसणारे लायटर दाखवत धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. घर मालकिणीच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेला फोनवरून धमकावल्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी घर मालकीण आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली.
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथील जांगिड गॅलेक्सी टॉवरमध्ये मोनिका शर्मा या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या घरी गेल्या सहा महिन्यांपासून पीडित महिला घरकाम करीत आहे. या महिलेने शनिवारी (ता. ६) एक दिवसाची सुट्टी मोनिका यांच्याकडून घेतली; मात्र त्यानंतर चार दिवस उलटूनही महिला घरकाम करण्यासाठी येत नसल्याने आणि वारंवार संपर्क करूनदेखील फोन उचलत नसल्याने मोनिका शर्मा यांचा संताप अनावर झाला. मंगळवारी पुन्हा त्यांनी महिलेला फोन केला असता तिने उचलला. या वेळी संतापलेल्या मोनिका शर्मा आणि त्यांच्या मुलाने या महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिथे असाल तिथून उचलून आणू, अशी धमकी मालकिणीच्या मुलाने दिली. हा घडलेला सर्व प्रकार पीडित महिलेने तिच्या नातेवाइकांना सांगितला. त्यानंतर पीडित महिलेसह तिचे नातेवाईक जाब विचारण्यासाठी घर मालकिणीच्या इमारतीखाली गेले. त्या वेळी दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद झाला. या वादात घर मालकिणीच्या मुलाने बंदूक रोखली. या प्रकाराने घाबरलेल्या कुटुंबीयाने याबाबत कासारवडवली पोलिसांना कळवताच त्वरित घटनास्थळी पोलिस पोहोचले. पोलिसांच्या चौकशीत धाक दाखवण्यासाठी वापरलेली बंदूक ही खरी नसून बंदुकीसारखा दिसणारा लायटर असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी घर मालकीण मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT