डोंबिवलीतील चतुरंग रंगसंमेलनात सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे पस्तीसावे रंगसंमेलन आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळा २७ व २८ डिसेंबर रोजी स. वा. जोशी शाळेच्या पटांगणावर संध्याकाळी ४.३० ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात मुंबईत मेट्रो जाळ्याचा विस्तार घडवून आणणाऱ्या आणि ‘मेट्रो वूमन’ म्हणून परिचित असलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत घेण्यात येणार असून, त्यांना ‘अभिमान मूर्ती’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
अश्विनी भिडे यांची मुलाखत डॉ. सागर देशपांडे घेणार असून, पुरस्काराचे प्रदान लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विधान परिषदेचे माजी आमदार डॉ. अज्ञोक मोडक यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. दोन दिवसांच्या रंगसंमेलनात विविध दर्जेदार कलाविष्कारांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. पंडित रामदास पळसूले व पंडित कृष्णा साळुंखे यांच्या शिष्यवर्गाचा ‘नाद नभांगणी नांदतो’ हा गुरू परंपरेचा वादन कार्यक्रम सादर होणार आहे.
कथक गुरू नृत्यांगना ॲड. सुनीला पोतदार यांनी संकल्पित केलेली ‘अष्टभुजा नारायणी’ ही नृत्यवंदना श्री मुद्रा कलानिकेतन, एकलव्य आर्ट फोरम, नटश्री नृत्यालय आणि ईश्वरी कुलकर्णी यांच्या सहभागासह रंगणार आहे. बासरीवादक अमर ओक आणि व्हायोलिनवादक श्रुती भावे-चितळे यांची जुगलबंदीही रंगसंमेलनाची शोभा वाढवणार आहे. नाट्यसंगीत परंपरेचा मागोवा घेणारा कीर्तनकार चारूदत्त आफळे यांचा ‘साद देती स्वर शिखरे’ हा कार्यक्रमही या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. रंगसंमेलनाच्या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आहेत.
चतुरंग रंगसंमेलनाच्या प्रवेशिका मोबाईल क्रमांक ९८२०९५७५९९ वर किंवा डोंबिवली विभागीय अधिकारी कार्यालयाजवळील बाजीप्रभू चौकातील नाट्य तिकीट विक्री खिडकीवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी नीलिमा भागवत ९८१९०५३५०९ व सचिन आठवले ९९२०९९२१०९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.