मुंबई

पाईपलाईन फुटीने प्रशासन हलले

CD

टिटवाळ्यात पाइपलाइन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
टिटवाळा, ता. १० (वार्ताहर) : टिटवाळा पूर्वेतील वाजपेयी चौकाजवळ रवींद्र रेसिडेन्सीकडील मुख्य रस्त्यावर पाईपलाईन फुटीने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती. यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून यातूनच नागरिकांनी मार्गक्रमण करावे लागत होते. यासंबंधीची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होताच प्रशासनाला अखेर जाग आली असून पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
गेल्या महिनाभरात या रस्त्यावर पाइपलाइनमधून पाणी गळती होत होती. यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाणी आणि चिखल यामुळे शाळकरी मुले, महिला, वाहनधारकांचा नाहक त्रास होत होता. तर, पाइपलाइन फुटीमुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. यासंदर्भातील बातमी ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होताच या ठिकाणीचे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे. याठिकाणी सकाळपासूनच जेसीबी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पाइलाइन फुटीची दुरुस्ती तात्काळ सुरू केली असून काम पूर्ण होईपर्यंत पथक तैनात राहील, अशी माहिती अधिकारी भदाने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro News: मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी! 'या' दोन लाईनवरील रेल्वे सेवेच्या वेळेत बदल; कधी आणि का? जाणून घ्या...

विराट कोहली - रिषभ पंत BCCI चा नियम पाळणार! वनडे स्पर्धा खेळणासाठी संभावित संघात निवड

Mundhwa Land case: शीतल तेजवाणीचं आणखी घर आणि कार्यालय असण्याची शक्यता; पोलिसांच्या हाती काय लागलं?

Pune Protest : लोकमान्यनगर पुनर्विकासातील अनिश्चिततेविरोधात नागरिकांचा संताप उसळला; “हक्काचं घर” वाचवण्यासाठी जोरदार आंदोलन!

Maharashtra GST Strike : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतरही जीएसटी अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT