मुंबई

एकल प्लास्टिक वापरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

CD

एकल प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
११ महिन्यांत २०.६५ लाख दंड, २,१४६ किलो प्लॅस्टिक जप्त
वाशी, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबईत एकल वापर प्लॅस्टिकविरोधात पालिकेची मोहीम अधिक तीव्र झाली नागरिक आणि व्यावसायिकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत सातत्याने वाढ होत आहे. पर्यावरण रक्षणाची गरज लक्षात घेऊन पालिकेने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांत २० लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, २,१४६.९७० किलो एकल वापर प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. विभागनिहाय ८ आणि परिमंडळनिहाय २ अशी एकूण १० विशेष तपासणी पथके या मोहिमेत गुंतलेली आहेत.
तपासणीदरम्यान प्लॅस्टिक पिशव्या किंवा एकल वापर प्लॅस्टिक वस्तू आढळल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. अधिक दंड वसूल करणे हा हेतू नसून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्लॅस्टिकचा वापर थांबवणे, हेच या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेतर्फे विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून, नागरिक व व्यावसायिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा पर्याय स्वीकारावा, तसेच दुकानांत प्लॅस्टिक पिशव्या न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. निसर्ग आणि मानवी जीवनाच्या सुरक्षेसाठी प्लॅस्टिकविरहित शहरे उभारण्याच्या दिशेने ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे.
-----
चौकट
कारवाई
- मागील ११ महिन्यांत सुमारे २०.६५ लाख रुपये दंड आकारला.
- तपासणी मोहिमेत २,१४६ किलोपेक्षा अधिक प्लॅस्टिक साहित्य जप्त.
- एकूण १० विशेष पथकांच्यावतीने सतत तपासणी.
- प्लॅस्टिक वापर आढळल्यास तत्काळ दंड व साहित्य जप्तीची कारवाई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT