मुंबई

जमीन विक्रीतून लाखोंची फसवणूक

CD

जमीनविक्रीतून लाखोंची फसवणूक
पनवेल, ता. १० (वार्ताहर) ः चेरवलीतील ६० गुंठे जमीनविक्रीच्या बहाण्याने कोपरखैरणेतील एकाची ९२ लाख ७३ हजारांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात पनवेल शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल आहे.
कोपरखैरणे गाव येथे राहणारे रमेश वेटा (६९) यांची नोव्हेंबर २०११ मध्ये भीमराव राठोड याच्यासोबत पनवेलमध्ये भेट झाली होती. राठोड याने त्याच्या मालकीची चेरवली येथे ६० गुंठे जमीन असल्याचे सांगून प्रती गुंठा एक लाख रुपयाप्रमाणे ६० लाख रुपयांमध्ये विकत घेण्याचे सांगितले. त्या वेळी राठोडने बनावट सातबारा उतारे दाखवून जमीन नावावर असल्याचे भासवले होते. त्यामुळे रमेश वेटा यांनी जमीन खरेदी करण्यास सहमती दर्शवून पैसे देण्यास सुरुवात केली. मार्च २०१२ मध्ये पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे रमेश वेटा यांनी राठोड यांना चेकद्वारे ५३ लाख ८० हजार रुपये दिले; मात्र मे २०१२ मध्ये जमिनीचे मूळ मालक वासुदेव, बाळाराम विठ्ठल लाड दोघे असल्याचे समजले. त्यानंतर याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT