मुंबई

आंबोली नदी पुलावर खड्ड्यांचा कहर

CD

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचा कहर
आंबोली नदीपुलावर अपघातांच्या धोक्यात वाढ
कासा, ता. १० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या अर्धवट कामामुळे महामार्गावरील पूल आणि उड्डाणपुलांवर मोठे खड्डे पडून वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. विशेषतः आंबोली नदी पूल आणि महालक्ष्मी उड्डाणपूल अपघातांचे हॉटस्पॉट ठरत आहेत, अशी तक्रार नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.
आंबोली नदीपुलावर फ्लोअरिंगचे काम सुरू असताना रस्त्यावर खोल खड्डे निर्माण झाले आहेत. वारंवार तात्पुरती दुरुस्ती करूनही खड्डे कायम राहत असल्याने येथे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकी आणि हलक्या वाहनांचे संतुलन बिघडण्याचे प्रकार वाढले आहेत. याचप्रमाणे, महालक्ष्मी उड्डाणपुलावर सिमेंट काँक्रीटचे काम अर्धवट असून, उंचसखल पॅचेस आणि डांबराचे असमान थर यामुळे रस्त्यावर अचानक चढ-उतार तयार झाले आहेत. त्यामुळे वाहनांना अचानक ब्रेक मारावा लागत असून, मागून येणाऱ्या वाहनांची धडक होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालकांनी नवीन काँक्रीट रस्त्याच्या गुणवत्ताहीन कामामुळे अपघात वाढल्याची तक्रार वाहनचालक करत आहेत. सध्या महामार्गावरून प्रवास करणारे चालक अत्यंत त्रस्त झाले असून, महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व सुरक्षित प्रवास सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

महामार्ग प्राधिकरणाचे आश्वासन
या गंभीर स्थितीबाबत कंत्राटदाराला तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत. आंबोली नदीपूल आणि महालक्ष्मी उड्डाणपुलावरील सर्व खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. वाहनचालकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल, असे महामार्ग प्राधिकरणाचे प्रबंधक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : नंदूरबारमध्ये जखमी अवस्थेत सापडले बिबट्याचे बछडे; वनविभागाकडून उपचार सुरू

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT