मुंबई

धारावीतील पालिकेचा आपला दवाखाना मृत्युशय्येवर

CD

पालिकेचा ‘आपला दवाखाना’ मृत्यूशय्येवर
धारावी महाराणा प्रतापनगरमधील रुग्णांकडून नाराजी

धारावी, ता. १० (बातमीदार) ः मुंबई महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत मुंबईतील अनेक वस्त्यांमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला. सुरुवातीला हे दवाखाने व्यवस्थित सुरू होते; मात्र यातील बरेच दवाखाने आता बंद पडू लागले आहेत. धारावीतील अनेक दवाखान्यांची अशीच अवस्था असून ते सुरू नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
धारावीतील ढोरवाडा विभागातील महाराणा प्रतापनगर येथील ‘आपला दवाखाना’ची दुरवस्था झाली आहे. हा दवाखाना कधी सुरू असतो हेही कळत नाही. अनेकदा रुग्ण या ठिकाणी येतात; मात्र दवाखाना बंद असल्याने निराश होऊन परत जातात. घराजवळच पालिकेचा मोफत दवाखाना सुरू झाल्याने स्थानिक रहिवासी समाधान व्यक्त करीत होते; पण काही महिन्यांनंतर हळूहळू दवाखाना सतत बंद असल्याचा अनुभव रहिवाशांना येऊ लागल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. धारावीच्या अनेक भागांतील आपला दवाखाना बंद असल्याने रहिवाशांना खासगी डॉक्टरकडून उपचार करून घ्यावे लागत आहेत.


धारावीतील आपला दवाखान्याच्या सद्यस्थितीकडे मी जातीने लक्ष घालतो. तसेच संबंधित आरोग्य अधिकारी यांना पाठपुरावा करण्यास सांगतो. दवाखाने सुरू असतात, तरीही मी पाठपुरावा घेतो.
- बाबासाहेब कवळे, मुख्य आरोग्य अधिकारी, ग/उत्तर पालिका विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT