मुंबई

मध्य रेल्वेचा पुन्हा बोजवारा;

CD

अग्निरोधक यंत्रणेचा रेल्वेसेवेला फटका
बदलापूर-वांगणीदरम्यान रुळालगत धुराचा परिणाम
बदलापूर, ता. १० (बातमीदार) ः मध्य रेल्वेची लोकल सेवा बुधवारी (ता. १०) पुन्हा एकदा विस्कळित झाली. बदलापूर-वांगणीदरम्यान असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर लागलेल्या आगीचा धूर थेट ट्रॅकपर्यंत पोहोचल्याने सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील स्वयंचलित अग्निरोधक यंत्रणा आपोआप सक्रिय झाली. परिणामी, या मार्गात धावणाऱ्या सर्व गाड्या अचानक थांबल्या. जवळजवळ तासभर चाललेल्या या प्रकारात मोटरमन आणि गार्ड यांना रुळांवर उतरून यंत्रणा रीसेट करण्याची वेळ आली. त्यानंतरच गाड्यांची वाहतूक पुन्हा सुरू झाली.

या तांत्रिक अडथळ्याचा सर्वाधिक फटका बदलापूर-कर्जत मार्गावरील प्रवाशांना बसला. सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल तासभर उशिराने धावत असल्याने मुंबईला कामानिमित्त निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. लेटमार्कचा फटका, अतिगर्दी आणि थांबून-थांबून सुटणाऱ्या लोकलमुळे प्रवासी संतप्त झाले होते. हा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने रुळांच्या कडेला असलेला कचरा तातडीने हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर प्रवाशांकडून तिसरी-चौथी मार्गिका लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी अधिक जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ: फायनलमध्ये अहमदाबादची खेळपट्टी कोणाला मदत करणार? समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

UPSC success story : यूट्युबवर ऑनलाईन व्हिडिओ पाहून कोल्हापूरच्या आरुषा पाटीलने युपीएसीमध्ये मिळवलं यश, तुम्हीही म्हणालं...

Baba Khan: धाड.. धाड.. धाड.. घरावर बेछूट गोळीबार; घटनेत पोलीसही जखमी, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरसोबत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

Women’s Day Finance Planning: महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी टर्म विमा आणि निवृत्ती नियोजन का आवश्यक?

Nagpur Crime News : कामठीत बनावट नोटांचा पर्दाफाश; तीन व्यापाऱ्यांना अटक, कसा उघडकीस आला प्रकार?

SCROLL FOR NEXT