मुंबई

राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबई शहराची दमदार कामगिरी

CD

मुंबई शहराच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत सहा पदकांची कमाई

शिवडी, ता. १० (बातमीदार) : गोंदिया आमगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करताना स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहरच्या खेळाडूंनी लाइट कॉन्टॅक्ट या प्रकारात दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकांची कमाई केली.
१७ वर्षांखालील मुलींच्या ५५ किलो वजनी गटात एम. डी. कॉलेज, परेलच्या दुर्वा मिथुन गावडेने, तर १९ वर्षांखालील मुलांच्या ७० किलो वजनी गटात एम. डी.च्याच प्रज्ञेश मिलिंद पटवर्धन याने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. १४ वर्षांखालील मुलांच्या ३८ किलो वजनी गटात श्री वल्लभ आश्रम स्कूल, सायनचा श्रेयांक मौर्या, ६३ किलो पेक्षा जास्त वजनी गटात व्ही. एन. सुळे हायस्कूल, दादरचा पार्थ कदम, तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलो गटात जय हिंद कॉलेजचा यथार्थ बुडामाला यांनी रौप्य कमाई केली.
कांस्यपदक विजेत्यांमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या ३२ किलो वजनी गटात व्ही. एन. सुळे हायस्कूल, दादरचा ग्रिशम पटवर्धनने कांस्यपदाकावर मोहर उमटवली.
या खेळाडूंना प्रशिक्षक उमेश मुरकर, विघ्नेश मुरकर, विन्स पाटील, आशिष महाडिक, अलोक ब्रीद आणि आफताब खान यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT