मुंबई

शिवसेना (ठाकरे गट) अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुखपदी मुन्ना आखवारे

CD

शिवसेना (ठाकरे गट) अल्पसंख्याक जिल्हाप्रमुखपदी मुन्ना आखवारे
पेण, ता. १० (वार्ताहर) : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) संघटनात्मक बळकटीसाठी जोरदार तयारीला लागली आहे. या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते अनंत गीते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये पेण शहरातील असदअली अब्दुललतिफ अखवारे उर्फ मुन्ना अखवारे यांची रायगड जिल्हा अल्पसंख्याक जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्तिपत्रे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते देण्यात आली. अनेक वर्षांपासून शिवसेना (ठाकरे गट) मध्ये सक्रिय राहून पक्षविस्तार, संघटन बांधणी आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्कात मुन्ना अखवारे यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या निष्ठा, कार्यकुशलता आणि नागरिकांमध्ये असलेली पकड याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. नियुक्ती स्वीकारताना मुन्ना अखवारे यांनी पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रायगडमधील अल्पसंख्यांक समाजापर्यंत पक्षाची भूमिका आणि कार्यक्रम पोहोचवणे, संघटन मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) अधिक सक्षमपणे लढेल यासाठी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शहरप्रमुख सुहास पाटील, विभागप्रमुख गजानन मोकल, लवेंद्र मोकल, युवासेनाप्रमुख चेतन मोकल, वाहतूक सेना पदाधिकारी श्रीतेज कदम, शिवाजी म्हात्रे, महिला आघाडीच्या दर्शना जवके, महानंदा तांडेल यांसह अनेक शिवसैनिक दाखल झाले होते. उपस्थितांनी मुन्ना अखवारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि नवीन जबाबदारीसाठी अभिनंदनही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Dream Unfulfilled : ‘’धर्मेंद्र यांचे ‘ते’ स्वप्न अर्धवटच राहिले...’’, हेमा मालिनींनी प्रार्थना सभेत केला खुलासा!

IND vs SA, 2nd T20I: शुभमन गिलचा घरच्या मैदानावरही भोपळा! संजू सॅमसनला आता तरी खेळवा, चाहत्यांची मागणी

Viral : किती खाणेरडापणा! 19 मिनिट 30 सेकंद व्हिडिओचा पार्ट 2 व्हायरल? शेअर होतीये लिंक; पोलिसांची वॉर्निंग

Navale Bridge Accident: पुण्यातल्या नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक; घेतला 'हा' निर्णय

Pune Harassment Case : गणेश पार्क ते लोहगाव परिसरात महिलांची छेडछाड करून पाळायचा; शेवटी आरोपी विमानतळ पोलिसांच्या सापळ्यात!

SCROLL FOR NEXT